वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

*जिल्हा परिषद मराठी शाळा कुंडलवाडी* चा वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात *विविध गुणदर्शन कार्यक्रम(गॅदरिंग)* शनिवारी 7 मार्च रात्री संपन्न झाला. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी हिंदी गाण्याबरोबरच जागर मराठी लोककलेचा हा तुफान विविध गुणदर्शन कार्यक्रम 5 तास सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती मिनाक्षी नानासो महाडीक (काकी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी, गटशिक्षणाधिकारी प्रदिप कुडाळकर साहेब, विस्ताराधिकारी माळी मॅडम,शा.पो.आ. प्रमुख माळी साहेब, केंद्रप्रमुख भगवान साठे साहेब, तसेच जिल्ह्यातील शिक्षक बंधू, संघटनेचे पदाधिकारी,भगवान बोते सर, मोमीन सर,कदम सर, सरपंच व सर्व सदस्य, व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते. 
       यावेळी शाळेला प्रिंटर व बक्षीसरुपात रोख 11,000 रु. चे बक्षिस मिळाले.. माझ्या लाईव्ह टीम ने मोलाचं सहकार्य केले अन् शेवटपर्यंत कार्यक्रम उठावदार केला... मुख्याध्यापक भामिनी पाटील मॅडम व माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या एकत्रित नियोजनातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. कोणताही कोरिओग्राफर न बोलता सुतार मॅडम व मी स्वतः या कार्यक्रमाची कोरिओग्राफी करुन विद्यार्थ्यांच्या अंगी नृत्याविष्कार बाणविले व त्याला यशही मिळाले.माझ्या सर्व सहकार्‍यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप आभार... -प्रwin डाकरे


Post a Comment

Previous Next

نموذج الاتصال